0

मंगळवेढा / प्रतिनिधी माण नदी पात्रातील वाळू चोरून साठा केल्याप्रकरणी अमोल इंगळे, बाळासो इंगळे (रा.मारापूर) या वाहनचालक, मालकांविरूध्द वाळूचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, घरनिकी सजेच्या तलाठी दिपाली मारूती पवार या कोतवालासह माण नदीकाठावर वाळूचोरी विरोधात कारवाई करत गस्त घालीत असताना माण नदीकडे जाताना रस्यावर टमटममधून (क्र. एम.एच.१३/टी.आर. ९१९) वरील चालक व मालक नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू आणून साठा करीत असल्याचे तलाठी दिपाली पवार यांच्या नजरेस आली. ही घटना दि. ५ रोजी सकाळी ११.३0 वाजता घडली. याबाबत अधिक चौकशी केली असता नदीपात्रातील दीड ब्रास वाळू ४ हजार रूपये किमतीची चोरल्याचे उघड झाल्यानंतर वरील दोघाविरूध्द तलाठी पवार यांनी पोलीसात वाळूचोरीची फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शंकर चव्हाण करीत आहेत.

Post a Comment

 
Top