0

मंगळवेढा / प्रतिनिधी
मासिक सभेत माझे का ऐकत नाही? असा जाब विचारून आंधळगावचे ग्रामसेवक अशोक शिवाजी चव्हाण यांना श्रीमुखात भडकवून जखमी केले, तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य शंकर दिगंबर शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी तथा ग्रामसेवक अशोक चव्हाण हे दि. ६ रोजी सकाळी १0.३0 वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसले होते. यादरम्यान, ग्रामपंचायत सदस्य शंकर शिंदे हे खुर्चीवर येऊन बसले. ग्रामसेवकांनी काय काम आहे अशी विचारणा केली मात्र त्यांनी कांहीही न बोलता ते निघून गेले. तदनंतर ग्रामसेवक चव्हाण हे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील पाईपखरेदीचे चलन भरण्यासाठी मोटरसायकलवरून (क्र. एम.एच.१३/बी.डी. ६३९८) लक्ष्मीदहिवडी येथील बँक ऑफ इंडियाकडे जात असताना रस्त्यामध्ये मोटरसायकल अडवून मी ग्रामपंचायत सदस्य आहे. मासिक सभेत माझे का ऐकत नाही? असे म्हणून अर्वाच्च भाषेत शिवीगाळी करून श्रीमुखात भडकावली. यादरम्यान, चव्हाण यांनी आरडाओरडा करताच मामा नागणे, शत्रुघ्न चव्हाण, सुरेश माळी आदी घटनास्थळी पळत आहे. यादरम्यान, आरोपी शंकर शिंदे हे प्रोसेडिंग रजिस्टर घेऊन पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ग्रामसेवक चव्हाण यांच्या कानाला जखम झाल्यामुळे त्यांना सोलापूर येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.

Post a Comment

 
Top