0

सोलापूर / प्रतिनिधी
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीमुळे ताणतणाव वाढत आहे, म्हणून सामुहिक रजेवर गेलेल्या मंगळवेढा तालुक्यातील तलाठय़ांना जिल्हाधिकारी मुंढे यांनी नोटिस बजावून कामावर रुजू व्हा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी महसूलचा कारभार पेपरलेस करण्यासाठी सर्व कर्मचार्‍यांना सक्त सूचना देत वेळेत काम करण्याचे आदेश दिले होते. तरीही ऑनलाईन सातबारा उतारा नोंदणीला वेग येत नव्हते. त्यामुळे सर्व तहसील कार्यालयाच्या कर्मचार्‍यांना कामे वेळेत करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीमुळे तलाठय़ांना मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे ताणतणाव वाढत आहे. म्हणून मंगळवेढा तालुक्यातील ३९ तलाठी आणि ५ मंडल अधिकारी सामुहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे कामावर परिणाम होत आहे. जिल्हाधिकारी मुंढे यांनी रजेवर गेलेल्या सर्व तलाठय़ांना व मंडल अधिकार्‍यांना नोटिस बजावून कारवाईचे संकेत दिले आहेत.

वाळू चोरी रोखण्यासाठी चोख बंदोबस्त

जिल्ह्यातील ५0 वाळूसाठय़ांपैकी केवळ १२ साठय़ांचाच लिलाव झाला आहे. उर्वरित ठिकाणच्या साठय़ांसाठी ठेकेदारांनी बोलीच न लावल्यामुळे ३८ साठय़ांचा लिलाव झाला नाही. लिलाव न झालेल्या ठिकाणाहून वाळू चोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या सर्व साठय़ांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

कुळ कायद्याचे एकूण १२ हजार प्रकरणे

कुळकायद्यातील कलम ४३ ला पात्र असलेल्यांकडून ४0 पट रक्कम आकारुन कुळाचे शर्त कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण १२ हजार ६0२ कुळ कायद्याचे प्रकरण आहेत. त्यापैकी ७३३८ शेतकर्‍यांनी ४0 पट रक्कम भरु शर्त कमी केली आहे. उर्वरित ५२६४ प्रकरणे लवकरच निकाली काढण्यात येणार आहे. कुळ कायद्याची प्रकरणे निकाली काढण्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर असल्याचे जिल्हाधिकारी मुंढे यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top