0

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी येथील विद्यामंदिर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना आम आदमी विमा योजनेअंतर्गत मिळणार्‍या शिष्यवृत्तीचे धनादेश सरपंच संगीता सोनवले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी विद्यामंदिर हायस्कूलचे अध्यक्ष सुभाष जालगिरे, विकास सोनवले, श्रीकांत साळे, तलाठी राऊत, मुख्याध्यापक एम.एस. जुंदळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सरपंच संगीता सोनवले यांनी सांगितले की, जी कुटुंबे भूमिहीन, अल्पभूधारक आहेत, अशा पालकांनी तहसील कार्यालयामध्ये आम आदमी विमा योजनेचे सदस्य होण्यासाठी अर्ज दाखल करावे, जे कुटुंब या योजनेत सदस्य आहेत त्यांच्या ९ वी ते १२ वीत शिक्षण घेणार्‍या मुला-मुलींना महिना शंभर रूपये शिष्यवृत्ती मिळते. ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून देण्यासाठी पालकांना प्रवृत्त करावे, असे आवाहन सरपंच सोनवले यांनी केले.

Post a Comment

 
Top