काव्यश्रध्दांजली..
!!..आबा..!!
कोपरखळ्या मारत
गाजवायचात सभा..
तुमचं भाषण ऎकायला
उत्सुक होता,महाराष्ट्र उभा..
अर्ध्यावरती डाव सोडून
निघुन गेलात आबा....!!
तुमच्या एका निर्णयानं
पेटल्या घरोघर चुली
बारमध्ये नाचायच्या
बंद झाल्या मुली
या तुमच्या निर्णयानं
सावरले संसार
अन् उगवली मंगलप्रभा
अर्ध्यावरती डाव सोडून
निघुन गेलात आबा....!!
हाती घेतलं तुम्ही
स्वच्छतेचं व्रत
गाडगेबाबांच्या विचारांवर
वाटचाल करत..
फक्त बोलण्यापेक्षा कॄती करत
प्रत्येकाच्या मनावर
घेतला तुम्ही ताबा
अर्ध्यावरती डाव सोडून
निघुन गेलात आबा....!!
तुमच्या रुपानं आदर्श मिळाला
शेतक-यांच्या पोरांना..
भुलला नाहीत तुम्ही कधी
पदे अन् प्रलोभनांना..
त्याचीच पावती म्हणून
हात जोडून आज सारा
महाराष्ट्र उभा...
अर्ध्यावरती डाव सोडून
निघुन गेलात आबा....!!
महाराष्ट्राच्या या जिंदादील आदर्श नेत्याला भावपुर्ण पुष्पांजली...👏👏💐💐
Post a Comment