मंगळवेढा / प्रतिनिधी
शाळेत घेतलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी विरोधकाचा सत्कार का केला म्हणून मुख्याध्यापकास शिवीगाळ करून, चप्पलने मारहाण करत दमदाटी केल्याची घटना दि. १३ रोजी दुपारी ४ वाजता घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील मंडले वस्ती या दोन शिक्षकी शाळेमधील मुख्याध्यापक आनंद नारायण जगताप यांना दि. १२ रोजी शाळेने घेतलेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी विरोधी गटाचे सिध्देश्वर मासाळ यांना कार्यक्रमात बोलावून सत्कार का केला? असे म्हणून ग्रामपंचायत सदस्य सुखदेव केराप्पा बंडगर, बापू नामदेव बंडगर या दोघांनी मुख्याध्यापक जगताप यांना अर्वाच्च व एकेरी भाषेत बोलत शिवीगाळ करून दमदाटी केली आणि चप्पलने मारहाण करून त्यांना शाळेच्या आवाराबाहेर ढकलून दिले. याबाबत संबंधित मुख्याध्यापक जगताप यांनी सुखदेव बंडगर व बापू बंडगर यांच्याविरूध्द मंगळवेढा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी त्या दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार पाटील हे करीत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment