0


मुंबई: पोलीस भरती होणाऱ्या तरुणांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. कारण यापुढं पोलीस भरती प्रक्रियेत पुरुषांना 1600 मीटर, तर महिलांना 800 मीटरच धावावं लागणार आहे. यापूर्वी पुरुषांना 5 किलोमीटर, तर महिलांना 3 किलोमीटर धावावं लागत होतं. यासंदर्भात राज्यसरकारनं मुंबई उच्च न्यायलयात स्पष्टीकरण दिलं. गेल्या वर्षी पोलीस भरती दरम्यान पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यासंदर्भात ‘ऑल महाराष्ट्र ह्यूमन राइट्स असोसिएशन’च्या पत्राची हायकोर्टाने दखल घेतली. त्यानंतर सोमवारी झालेल्या सुनावणीत सरकारनं कोर्टापुढे ही माहिती सादर केली. कोर्टान दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने पोलिस भरतीदरम्यान धावावं लागणारं अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयावर कोर्टाने समाधान व्यक्त केलं.

Post a Comment

 
Top