रायपूर (छत्तीसगड) - भारतातील तरुणाईसाठी आनंदाची बातमी आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण होताच आपोआप मतदार यादीत नाव समाविष्ट होईल. इतकेच नव्हे तर मतदार ओळखपत्रही घरपोच मिळेल. म्हणजेच ओळखपत्रासाठी आता मतदान केंद्र वा निवडणूक अधिकार्याच्या कार्यालयात खेट्या घालण्याची गरज राहणार नाही.
मतदार यादीत नाव समाविष्ट व्हावे म्हणून अर्जही भरण्याची आवश्यकता राहणार नाही. याव सर्व खटपटी आता एकट्या आधार कार्डामुळे सहजसाध्य होतील. केंद्रीय निवडणूक आयोग सध्या आधार कार्ड मतदारयादीशी लिंक करण्याची यंत्रणा उभारत आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित होऊ शकेल.
पत्ता ऑनलाइन बदलणे शक्य :
तुमचा बदललेला फोन क्रमांक वा पत्ता पुन्हा आधार कार्डावर नोंदवण्यासाठी यूआयडीएआयच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येईल. या सिस्टिममध्ये आधार कार्ड तयार असलेल्यांची नावे सर्वप्रथम जोडली जातील. १५ ऑगस्टनंतर कोणतेही आधार कार्ड तयार झाल्यास ते आपोआप निवडणूक आयोगाच्या सिस्टिमशी लिंक होईल.
अशी होईल नावनोंदणी
- आधार कार्ड तयार असलेली लहान वयाची मुले १८ वर्षांची होताच त्यांची नावे मतदार यादीत येतील.
- मोबाइलवर त्याचा कन्फर्मेशन मेसेज मिळेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment