0

खास मोबाईल प्रेमींसाठी एक गूड न्यूज आहे. मोबाईलची स्टोरेज क्षमता वाढवण्यासाठी सॅनडीस्क कंपनी २०० जीबीचे मेमरी कार्ड लाँच करणार आहे. सध्याच्या अनेक स्मार्टफोनमध्ये १२८ जीबी मेमरी कार्ड सपोर्ट करण्याची क्षमता आहे. हे विचारत घेवून सॅनडीस्क कंपनी २०० जीबीचे मेमरी कार्ड बाजारात उतवणार आहे. हे मेमरी कार्ड मायक्रो एसडी प्रकारातील म्हणजे सध्याच्या सर्व स्मार्टफोनमध्ये बसणारे आहे. सॅनडिस्कने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये या २०० जीबीच्या मेमरी चिपची घोषणा केली. या वर्षाखेरीपर्यंत हे २०० जीबीचे मेमरी कार्ड बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या सॅनडिस्कची १२८ जीबीची मेमरी कार्ड उपलब्ध आहेत. सॅनडिस्कचे हे २०० जीबीचे मेमरी कार्ड हे आतापर्यंतचे जगातील सर्वाधिक मेमरी क्षमतेची मेमरी चिप असणार आहे. सध्याच्या १२८ जीबीच्या मेमरी कार्डाच्या तुलनेत यात ५६ टक्के जास्त स्पेस आहे. या कार्डामध्ये प्रतिमिनीट १२०० इमेजेस म्हणजे ९० एबीपीएस या वेगाने ट्रान्सफर होऊ शकतात. तसेच या मेमरी कार्डामध्ये फुल्ल एचडी (1080P) रिझोल्यूशनचे २० तासांपर्यंतचे व्हिडिओ साठवले जाऊ शकतील. या कार्डाची किंमत २५ हजार रूपयांपर्यंत आहे.

Post a Comment

 
Top