0

महिला फौजदारास गुंगीचे औषध देऊन तिला फसवून विवाह करून आईवडिलास शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी शशीकांत जाधव व रविंद्र जाधव (रा. डोंगरगाव, ता. मंगळवेढा) यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या घटनेतील दत्तात्रय सावंत व सुनिल आकळे हे संशयित आरोपी फरार झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेची हकीकत अशी की, यातील पिडीत युवती ही ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. नोकरीला लागण्यापुर्वी दि. २६ डिसेंबर २0१३ रोजी पिडीत युवतीस पाठखळ येथील राहत्या घरातून गुंगीचे औषध पेयामधून देऊन वाहनातून कोल्हापूर येथे नेले व तिच्याशी शशीकांत जाधव याने विवाह केला. यावेळी विवाहाचे फोटोही काढण्यात आले होते. फिर्यादी ही तदनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर नोकरीस लागली. ती सध्या कळवा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असून दि. १५ एप्रिल २0१५ रोजी रजेवर पाठखळ गावाकडे येत असताना पेयामधून गुंगीचे औषध देऊन तिला पंढरपूर येथे नेऊन मारहाण केली. तसेच लग्नाचे फोटो आईवडिलांना दाखवेन असे म्हणून आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये फिर्यादीस किरकोळ मार लागल्यामुळे तिला मंगळवेढा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची फिर्याद दिली होती.

Post a Comment

 
Top