राज्यातील ४६३ न्यायाधीशांच्या बदल्या
औद्योगिक जिल्हा सत्र न्यायाधीशांचाही समावेश
दिवाणी आणि न्यायदंडाधिकार्यांच्या बदल्या
बाहेरून येणार १३ न्यायाधीश सोलापुरात
सोलापूर / प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने राज्यातील ४६३ न्यायाधीशांच्या राज्यांतर्गत न्यायालयात बदल्या करण्यात आल्या. सोलापूर जिल्हा न्यायालयीन व जिल्ह्यातील न्यायालयातील १८ न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत भोसले आणि त्यांच्या पत्नी आर.एस. भोसले यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
सोलापूर शहरातील औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश व औद्योगिक न्यायालय सदस्य एन.पी. बोस यांची नाशिक येथे, जिल्हा न्यायालयातील जिल्हा सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांची उस्मानाबाद येथे, तर व्ही.ए. दीक्षित यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आली आहे. औद्योगिक न्यायालयात न्यायाधीश म्हणून रायगड अलिबागचे पी.आर. भारड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील न्यायालयातील १५ दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. न्यायदंडाधिकारी पी.व्ही. हिंगणे आणि व्ही.एस. हिंगणे यांची औरंगाबाद येथे बदली करण्यात आली आहे. सोलापूर येथील दिवाणी न्यायाधीश एस.डी. कंकणवाडी यांची कल्याण-ठाणे येथे, पी.ए. पाटील आणि केदार कुलकर्णी या पती-पत्नी यांची जळगाव येथे, सोलापूर म्युन्सिपल कोर्टचे एन.एन. धेंड यांची गेवराई-बीड येथे, सोलापूर येथील आठवे दिवाणी न्यायाधीश एस.एस. गोरवाडे यांची निलंगा-लातूर येथे, सोलापूरचे दहावे दिवाणी न्यायाधीश एम.बी. सोनटक्के यांची नंदूरबार येथील शहादा येथे बदली करण्यात आली आहे. तसेच मंगळवेढा न्यायालयातील डी.एन. खेर यांची ठाणे येथे, सांगोला न्यायालयातील एफ.बी. बेत यांची बीड येथे, मोहोळ न्यायालयातील सी.एच. कुलकर्णी यांची ठाणे जिल्ह्यातील वसई येथे, माळशिरस न्यायालयातील न्यायाधीश एस.जे. बोंदरे आणि आर.आर. संकपाळ या पती-पत्नी यांची सांगोला न्यायालयात बदली करण्यात आली आहे.
बाहेरून आलेल्या १0 दिवाणी न्यायाधीशांची सोलापूर येथे नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये नांदेड, हदगाव येथील व्ही.एन. ठाकूर, नंदूरबार येथील शहादाचे पी.एम. बिदाडा, नाशिक येथील येवलाचे ए.आर. कोल्हापुरे, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचे एस.एस. जाधव आणि लातूर जिल्ह्यातील देवणीचे ए.आर. शेंडगे यांची सोलापूर येथे बदली करण्यात आली आहे. नंदूरबारचे दिवाणी न्यायाधीश एम.बी. असिजा यांची मंगळवेढा येथे, जळगाव येथील न्यायाधीश एस.एन. गोडबोले यांची मोहोळ येथे, नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार येथील आर.पी. कुलकर्णी यांची माळशिरस येथे, तर नांदेड जिल्ह्यातील कंधारचे न्यायाधीश डी.व्ही. कुटे यांची सोलापूर म्युनिसिपल कोर्ट येथे आणि लातूर येथील दिवाणी न्यायाधीश एफ.टी. शेख यांची सोलापूर न्यायालयात बदली करण्यात आली आहे. याचबरोबर न्यायदंडाधिकारी म्हणून उस्मानाबादचे पी.बी. मोरे यांची आणि मुंबईचे ६७ वे कोर्ट बोरिवलीचे एम.बी. पटवारी यांची सोलापुरात बदली करण्यात आली आहे.
<< Back to Headlines Next >>
Contact Us | About Us | Advertise with Us
Copyright© 2011 Punyanagari epaper
Designed & Developed by: Ezinemart
Post a Comment