0

  मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडीच्या लक्ष्मीदेवीची यात्रा शुक्रवार, १ मेपासून सुरू होणार आहे. यंदाही यात्रेमध्ये पिण्याच्या पाण्याची मुबलक प्रमाणात टँकरद्वारे सोय करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले. दहिवडीच्या यात्रेचा शुक्रवार हा पहिला दिवस असून, या दिवशी रात्री १२ वाजता कामतीची पाटी गावातून वाजतगाजत मिरवणूक काढून देवीच्या मंदिरात आणली जाते. शनिवार, २ मे रोजी दुरड्याच्या माध्यमातून गावातील सुवासिनी नैवेद्य आणून दाखवितात. रविवार हा या यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंगळवार हा यात्रेचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी दुपारी १२ वाजता सर्व मानकरी एकत्र येऊन मंदिराला प्रदक्षिणा मारून कोंडा लोटण्याचा कार्यक्रम करतात.

Post a Comment

 
Top