0

महमदाबाद[शे] ता. मंगळवेढा येथील माणनदीच्या पात्रातुन चोरटी वाळु वाहतुक वाढल्याचे दिसून येत आहे ठेकेदारांकडून  बिगर पावतीची हजारो ब्रास वाळु विकली जात आसुन शासनाचा कोटय़वधी रूपयांचा महसूल बुडत आहे. आधिकारी इकडे फिरकतही नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे .शेतकर्‍यांनी  अडवण्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांना दमादाटी करण्याचा प्रयत्नही होत असून तुम्हाला काय करायचे ते करा; आम्हाला कोणी काहीच करु शकत नाही अशा भ्रमात   वाळूकिंग वागत आहेत .
कलेक्टरसाहेब..
         जर तुम्ही स्वतः माणनदीच्या पात्रात येवून जर उचललेल्या वाळूचा पंचनामा केला तरच अधिकार्‍यांच्या संगनमताने चाललेला हा वाळूचा काळाबाजार तुमच्या लक्षात येईल .पण यासाठी तुम्हाला स्वतःला या माणनदीच्या पात्राची पाहणी करावीच लागेल .
आणि आपण ती कराल अशी आम्हा सगळ्यां शेतक-यांची अपेक्षा आहे

Post a Comment

 
Top