सोलापूर /
जिल्ह्यातील ७ वाळू ठेकेदारांनी आपल्या बोलीच्या १0 टक्क्यांनुसार ४ कोटी ५६ लाख २0 हजार रुपयांचा कर विक्रीकर खात्याकडे जमा केल्याची माहिती महसूलचे उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली. जिल्ह्यातील एकूण ५१ वाळू साठय़ांपैकी केवळ १३ साठय़ांचा लिलाव झालेला आहे. त्यातील ७ ठेकेदारांनाच ताबा मिळालेला आहे. वाळू साठय़ाचा लिलाव झाल्यानंतर सर्वोच्च बोलीच्या १0 टक्क्यांनुसार विक्रीकर रक्कम विक्रीकर खात्याकडे जमा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार पंढरपूर तालुक्यातील पोहोरगाव येथील साठय़ाचे ठेकेदार अभिजित पाटील यांनी ९१ लाख ५0 हजार रुपये, दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर- सिद्धापूर येथील साठय़ाचे ठेकेदार रघुनाथ नागणे यांनी ९५ लाख रुपये, अक्कलकोट तालुक्यातील आळगे येथील साठय़ाचे ठेकेदार दत्त एंटरप्रायजेसचे सुरेखा काटगाव यांनी ५९ लाख ५0 हजार रुपये, शेटफळ- ममदाबाद येथील साठय़ाचे ठेकेदार विनोद रोंगे यांनी १६ लाख २0 हजार रुपये, गुड्डेवाडी येथील ठेकेदार ८0 लाख रुपये आणि निमगाव येथील ठेकदारांनी २0 लाख रुपये भरल्याची माहिती उपजिल्हाधिकारी जाधव यांनी दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment