0

मंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा शहर सजेचे तलाठी नागनाथ जोध यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मंगळवेढा विभागाचे प्रांत अधिकारी श्रावण क्षिरसागर यांनी त्यांना निलंबित केले असल्याची माहिती तहसिलदार पुनाजी कोथेरे यांनी पत्रकारांना दिली. मंगळवेढा शहर सजेच्या दप्तराची प्रांत अधिकारी श्रावण क्षिरसागर यांनी तपासणी केली असता दप्तर तपासणीत अनेक त्रुटी आढळल्या. त्यामध्ये गाव नमुना १ मध्ये विभक्त झालेल्या गणेशवाडी, कचरेवाडी, फटेवाडी याचा गाव नमुना तयार केला नाही. सन २0१0-११ वर्ष वगळता इतर कोणत्याही वर्षाचा गोषवारा काढला नाही. सदर गोषवार्‍यावर फक्त तलाठय़ांची स्वाक्षरी असून अधिकार्‍यांच्या स्वाक्षरी घेतल्या नाहीत. स्तंभ दोन मध्ये नमुना एक नसल्याने तपासता आला नाही. कमी जास्त पत्रक संचयीका आढळून आली नाही. एकंदरीत फेरफार नोंदी वेळेत न करणे, चलन खरेदीची अनिश्‍चितता आदि गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.

Post a Comment

 
Top