मंगळवेढा तालुक्यातील १0 गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना १९९८ साली मंजूर झाली. माजी आमदार रामचंद्र साळे यांच्या काळात पूर्ण झाली. ग्रामपंचायतींनी वीज बील भरले तरच ही योजना व्यवस्थित चालू शकते. ही योजना चालविण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे ग्रामीण पाणीपुरवठाचे उपविभागीय अभियंता मोहन सरवदे यांनी 'पुण्य नगरी'शी बोलताना सांगितले. पुढे बोलताना सरवदे म्हणाले, एकूण वीज बिलाच्या ५0 टक्के रक्कम ग्रामपंचायतींनी महावितरणकडे भरली तर उर्वरित ५0 टक्के रक्कम जिल्हा परिषद भरणार आहे. त्यानंतर संबंधित योजनेअंतर्गत १0 गावच्या सरपंच व ग्रामसेवकांची शिखर समिती स्थापन करून योजना ताब्यात घेण्याचा लेखी करार करावा लागणार आहे. करार केल्यास या योजनेच्या दुरूस्तीचे ६४ लाखांचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद मंजूर करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत दुरूस्त करून घेऊन शिखर समितीकडे चालविण्यास देणार आहे. शिखर समितीकडे योजना हस्तांतरीत केल्यानंतरही भरलेल्या वीज बिलाच्या ५0 टक्के रक्कम प्रोत्साहनपर अनुदान म्हणून जि.प. शिखर समितीला देणार आहे. योजना सुरू झाल्यानंतर किरकोळ दुरूस्तीही शिखर समितीला करावी लागणार असून मोठय़ा दुरूस्त्या जिल्हा परिषद करेल. १0 गावांनी एकत्रितपणे शिखर समिती स्थापन करून योजना व्यवस्थित चालविली तर कधीही पाण्याची कमतरता भासणार नाही. सध्या वीज बील भरून योजना सुरू करून घ्यावी व पाणीटंचाईवर मात करावी, असे आवाहन सरवदे यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment