मंगळवेढा तालुक्यात भिषण दुष्काळ परिस्थिती असून प्रशासकीय यंत्रणेने व्यवस्थितपणो सर्व्हे करून शासनाकडे अहवाल पाठवावा व मंगळवेढा तालुका हा टचाईग्रस्त जाहीर करावा अशी मागणी मंगळवेढयाचे युवा उद्योजक समाधान आवताडे यांनी केली. मंगळवेढा तालुका हा ग्रामीण भागाचे मॉडेल असलेला तालुका असून आजही तो दुष्काळाच्या छायेतच जगत आहे. या तालुक्यात पाऊस पडलेला नसल्यामुळे जनावरांच्या चार्याचा व पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना दूर अंतरावरून पाणी आणावे लागते. त्यामुळे पाण्यासाठी जनतेची व जनावरांचीही भटकंती होत आहे.पाणी नसल्यामुळे लोक स्थलांतर करत आहे. मजूरांचे हाल होवू लागले असून गोरगरीबांची उपासमार सुरू आहे. शासनाने या नैसर्गिक आपत्तीला सर्वसामान्य जनतेने तोंड देण्याकरता या तालुक्यात जागोजाग जनावरासाठी चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करावेत,पिण्यासाठी पाण्याचे टँकर सुरू करावेत, रेशनकार्डवरील धान्य,मजुरांचे रोजगार तसेच दुष्काळी कामे याबाबतही योग्य उपाययोजना करावी तसेच याकरिता प्रशासनाने मंगळवेढा तालुका टंचाईग्रस्त जाहीर करून येथील जनतेला आधार द्यावा असेही मागणी आवताडे यांनी केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment