करकंबच्या अहिरे कुटुंबियांची देणगी
लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील तिर्थक्षेत्र लक्ष्मीदहिवडीच्या लक्ष्मीदेवीस मंदिराशेजारी असलेला पावणे दोन एकर जमीनीचा पट्टा करकंब येथील निर्मला अहिरे या महिला भक्ताने पैसे देऊन मंदिर समितीच्या नावे करून दिली. त्यामुळे त्या महिला भक्त व त्यांच्या कुटुंबियांची लक्ष्मीदहिवडीत जंगी मिरवणूक काढून त्यांचा सत्कार करण्यात आला. निर्मला अहिरे या पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील असून त्या सध्या मुंबईला वास्तव्यास आहेत. सत्कारानंतर बोलताना त्या म्हणाल्या, मी जन्मापासून या देवीस येत आहे. या देवीचे महात्म खूप मोठे आहे. या मंदिराला दान देण्याची इच्छा होती, ती मी बोलून दाखविल्यानंतर काहींनी जागेची अडचण सूचविली. त्यामुळे शेजारीच जमिनीची माहिती मिळाल्यानंतर ती जमीन घेऊन मंदिरास दिली आहे. यावेळी त्यांनी मंदिर समितीस ही काही सूचना केल्या व्यसनाच्या अधीन गेलेल्या काही गावातील लोकांना व्यसन सोडून मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याची विनंती केली. यावेळी सत्कार समारंभास लक्ष्मीदहिवडीतील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment