मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्यातून मंगळवेढा तालुक्यातील नऊ गावांना पाणी मिळणार होते. आता तेरा गावांना पाणी मिळणार आहे. निधीअभावी ही कामे बंद आहेत. या शिवाय सेतू पुलासाठी निधी नाही यामुळे येत्या अधिवेशनात या कामाच्या निधीबाबत आवाज उठविणार असून भाजप सरकारकडून मी म्हैसाळच्या पाण्यासाठी निश्चितपणो निधी मिळविणार आहे, अशी ग्वाही आमदार भारत भालके यांनी गावभेट दौर्यात येड्राव येथे बोलत असताना दिली. विधानसभेच्या निवडणुकीत मतदान केल्याबद्दल आभार व्यक्त करणे व जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी आ. भालके यांनी दौरा सुरु केला आहे. गुरूवारी त्यांनी हिवरगाव, भाळवणी, येड्राव, जित्ती, बावची, सलगर, पौट, सोड्डी, शिवणगी आदी गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत तानाजी काकडे, माजी सभापती भुजंगराव पाटील, बाजार समितीचे माजी संचालक जालिंदर माने, मुरलीधर सरकळे, प्रा.सुरेश कट्टे, येड्रावचे सरपंच गुलाब पाटील यांच्यासह अनेकजण होते. आ. भालके म्हणाले, मी तालुक्याच्या विकासासाठी प्रय▪करील म्हणून ज्येष्ठ नागरिक व शेतकर्यांनी मला मतदान केले. तालुक्यातील युवकांसाठी मी प्रकल्प राबवेन म्हणून युवकांनी मतदान केले. महिलांनी तसेच महिला बचत गटाने तयार केलेल्या मालाला ग्राहक पाहून देतील, बचत गटाला मदत करतील या हेतूने मतदान केले आहे. त्यांचा हा विश्वास मी कधीही गमावणार नाही. त्यांच्यासाठी मी माझी पाच वर्षे सातत्याने याच कामासाठी घालविणार आहे. तालुक्यात पाणी आणल्याशिवाय विकास होणार नाही, यामुळे अगोदर पाणी आणणार मगच इतर कामे करणार असल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले. पाण्याशिवाय कोणताच उद्योग धंदा करता येत नाही. त्यामुळे पाणी ही बाब या तालुक्यात अत्यावश्यक आहे. दुष्काळी निधी तहसील कार्यालयात पडून आहे. शेतकर्यांनी आपल्या बँकेतील खात्याचा क्रमांक तात्काळ द्यावा, येत्या आठ दिवसात ही रक्कम बँकेतील खात्यात जमा होणार आहे. सुमारे ६ हजार ४६१ खातेदार हे बँकेतील खाते क्रमांक न दिल्यामुळे यापासून वंचित राहिले आहेत. या सर्वांनी शासनाने दिलेले अनुदान लवकर घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment