0
 मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
 मंगळवेढा-मरवडे पासून चार कि.मी. अंतरावर भाऊसाहेब रुपनर यांनी सर्व सर्व सोयींनीयुक्त अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन साखर कारखाना सुुरु केला आहे. फॅबटेक कारखाना सुरु झाल्यामुळे मरवडेच्या बाजारपेठेत उलाढालही वाढली आहे. कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊसतोड मजूर यांना जवळची बाजारपेठ म्हणून मरवडेची बाजारपेठ सापडत आहे. यामुळे मरवडे येथे किराणा दुकान, कापड दुकान, भाजीपाला, मेडिकल दुकान, हॉटेल, सलून, पान टपरी आदी सर्व दुकानांमध्ये गर्दी वाढली असून ग्राहकांची संख्याही वाढली आहे. कारखान्याचे खातेदार हे रोख पैशाचे मरवडेतील दुकानदारांना मिळाल्यामुळे मरवडेची बाजारपेठ आर्थिक दृष्ट्या सक्षम बनली आहे. रोजची उलाढाल वाढत चालली आहे. एकूणात कारखान्याचा सीझन हा मरवडेतील व्यापारांना आनंददायी ठरू लागला आहे. भाऊसाहेब रुपनर यांनी मरवडे-नंदूर रस्त्यावर माळरानावर साखर कारखाना सुरु करताना वीजनिर्मिती प्रकल्प राबविला आहे. हीच वीज मरवडेला मिळणार आहे. उजनी उजव्या कालव्यातून येणारे पाणी मरवडेत आले असल्यामुळे सिंचन क्षेत्र वाढले आहे. अँड़ नंदकुमार पवार यांनी सामाजिक व सांस्कृतिक विकास केला. लतिफ तांबोळी यांनी व्यापारी संकुले वाढवून तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून चांगलाच हातभार लावला. रजाक मुजावर यांनी विकासाचे काम पुढे चालू ठेवले आहे. राजेंद्र पोतदार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मरवडेच्या विकासासाठी चांगले योगदान दिले आहे. सुरेश पवार यांनी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करुन सांस्कृतिक क्षेत्रात मरवडेचे नाव उंचावले आहे. मरवडेला चांगले भवितव्य आहे. भगरे यांचे मंगल कार्यालय हे तालुक्यातील सर्वात मोठे कार्यालय आहे. आता लतिफ तांबोळी यांनी मंगल कार्यालय सुरु करण्याचा प्रय▪केला आहे. त्यामुळे मरवडे ही या परिसरातील मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे.

Post a Comment

 
Top