0

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी येथील शिवानंद भीमाशंकर पाटील यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. पाटील यांनी या अगोदर राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीची ध्येय धोरणे व विचार समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि जनमानसात पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी मी संघटनात्मक कार्य करून पक्षाची प्रतिमार उंचावण्याचा प्रय▪करेन असे त्यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

 
Top