दामाजी'च्या सहविजनिर्मिती प्रकल्पाबाबत आवताडेंचे आरोप
मंगळवेढा / प्रतिनिधी निवडणुकीच्या तोंडावर श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ३५ कोटीत पुर्ण होणारा सहवीज निर्मिती प्रकल्प सुमारे १00 कोटीत बी.ओ.टी. तत्त्वावर देण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे कारखान्याचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार असल्याचा आरोप संचालक समाधान आवताडे यांनी केला आहे. आवताडे पुढे बोलताना म्हणाले, दामाजी कारखान्याच्या कार्यस्थळावर संचालक मंडळाची बैठक नुकतीच घेण्यात आली. सत्ताधारी संचालकांनी सुमारे १00 कोटी रुपयाचा सहवीज निर्मिती प्रकल्प उभा करणार असल्याचे सांगितले. अगोदर तोडणी वाहतुक बिले, ऊसाचा हप्ता अँडव्हान्स देण्यासाठी कारखान्यासमोर अनंत अडचणी समोर उभ्या आहेत. हा सहवीज निर्मिती प्रकल्प उभा केल्यास कारखान्याच्या उत्पन्नात भर पडणार असून ऊसाला जादा दर देण्यासाठी मदत होणार आहे. परंतू हा सहवीज निर्मिती प्रकल्प उभा करण्यासाठी ३५ ते ५0 कोटी रुपये खर्च येतो. जर या प्रकल्पातून कारखान्याला वार्षिक उत्पन्न २५ कोटी रुपये मिळत असेल तर मग बी.ओ.टी. तत्त्वावर हा प्रकल्प उभा करण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी केला. संचालक मंडळाने बी.ओ.टी. तत्त्वावर प्रकल्पास मान्यता द्यावी, असे सूचवून कारखान्याचे आर्थिक नुकसान करण्याचा घाट घातला आहे. या प्रकल्पाला माझा पुर्णपणे विरोध आहे. याच बैठकीमध्ये हा प्रकल्प उभा करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हा. चेअरमन बबनराव आवताडे यांनी बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्याची तयारी दर्शविली होती.
पैसे देणार्याचे स्वागतच
सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणे हा कारखान्याच्या हिताचा निर्णय आहे. या प्रकल्पामुळे कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारून ऊसाला चांगला भाव देता येणार आहे. कामगारांचे पगार वेळेत करण्यासाठी मदत होणार आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा प्रकल्प बी.ओ.टी. तत्त्वावर देण्याचा आमचा प्रय▪आहे. या प्रकल्पाला जर कोणी पैसे उपलब्ध करून देत असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. परंतू हा प्रकल्प आम्ही बी.ओ.टी. तत्त्वावरच उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- सूर्यकांत ठेंगील,
प्रभारी चेअरमन श्री संत दामाजी साखर कारखाना.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment