*जिल्हाधिकार्यांनी लक्ष घालण्याची मागणी
* कोरडवाहू योजनेचा बोजवारा
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी हे गाव कृषी विभागाच्या कोरडवाहू योजनेमध्ये आहे. या योजनेतून वर्षाला एक कोटी रुपये निधी विकास कामाला दिला जातो. या योजनेमधून लक्ष्मी दहिवडी येथील शेतकर्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे घेऊन चार महिन्यापूर्वी पूर्ण केली. मात्र, अजूनपर्यंत अनुदान न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
लक्ष्मीदहिवडी येथे गेल्या चार महिन्यापूर्वी ३0 शेततळी पूर्ण झाली आहेत. शेतकर्यांना घाई गडबड करून कृषी विभागाने मार्च अगोदर शेततळे पूर्ण करून त्यांचे टार्गेट पूर्ण करून घेतले. अनेक शेतकर्यांनी दागिने गहाण ठेऊन हात असणे पैसे घेऊन शेततळी खणली. पण अनुदान लटकल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे दहिवडी येथील सीमा पाटील, प्रभाकर पाटील, चंद्रकांत तोडकरी, महालिंग कानडे, दत्ता राजगे, बाळासाहेब धुरे, ज्ञानेश्वर माळी, नंदाबाई शेळके, मृगेंद्र स्वामी, बापू जुंदळे, मारूती झाडबुके, आशिष जालगिरे, सुनंदा कोष्टी यांच्यासह २४ शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे अनुदान लवकर मिळवून देण्याबाबत मागणी केली आहे. प्रत्येक गावात एक तरी शेततळे झाले पाहिजे, असे ठणकावून सांगणारे जिल्हाधिकारी मुंढे रखडलेल्या अनुदानाबाबत काय निर्णय घेतात याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे
.निधी प्राप्त होताच वाटप करू- कोरडवाहू योजनेचा निधी शिल्लक नाही. सदर निधी शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब शेतकर्यांना देण्यात येईल. - रफिक नाईकवाडी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सोलापूर.
Post a Comment