दिवसाढवळ्या हत्या झाल्याने भीतीचे वातावरण
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी येथे शनिवारी भर दुपारी साडेबाराच्या सुमारास माजी ग्रा.पं. सदस्य रामेश्वर जुंदळे यांचा गोळ्या झालून खून केला. सुशिक्षीत शिक्षकांचे गाव असलेल्या लक्ष्मीदहिवडी गावात भरदिवसा गोळ्या झाडून खून झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. रामेश्वर जुंदळे यांच्यावर रविवारी दुपारी २ वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत मनमिळावू मितभाषी स्वभावाच्या जुंदळे यांचा जेसीबी, ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. शेततळे काढणे, बांध बंदिस्ती करणे, पाईपलाईनची चारी काढणे अशी छोटीमोठी कामे ते मशीनद्वारे करत होते. व्यावहारिक दृष्ट्या अत्यंत सरळमार्गे असणारे जुंदळे यांना अचानक गोळ्या घालून मारल्याने संपूर्ण गावकर्यांना धक्का बसला आहे. सदर घटनेनंतर गावात चौकशीसाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक, पोलीस निरीक्षक, सर्वजण कसून तपास करत असल्याचे दिसत आहे. मात्र, ज्या गावाने कधी काठय़ा, कुर्हाडीची भांडणे पाहिली नाहीत. त्या गावात गोळ्या झाडून हत्या झाल्याने आसपासच्या गावातही भीतीचे वातावरण पसरले आहे.
रामेश्वर जुंदळेंच्या खून प्रकरणाचा तपास जवळजवळ पूर्ण होत आला आहे. दोन दिवसात संपूर्ण प्रकरणाचा छडा लावू. - किशोर करांडे, पोलीस उपअधिक्षक
Post a Comment