0

मुंबई : मुंबई पुन्हा एकदा सामूहिक बलात्काच्या घटनेने हादरली आहे. नालासोपाऱ्यात एका 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित तरुणी ही मूळची घाटकोपरची आहे.

9 नोव्हेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. पीडित तरुणीने या प्रकरणात निर्मलनगर पोलिस स्टेशनमध्ये आज गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, पीडित मुलगी 9 सप्टेंबर रोजी सूरतहून वांद्रे टर्मिनसला उतरली. त्यानंतर तिने घाटकोपरला जाण्यासाठी रिक्षा पकडली. परंतु चालकाने रिक्षा घाटकोपरला न नेता नालासोपाऱ्याच्या दिशेने वळवली. त्याचवेळी पाठलाग करणाऱ्या नराधमांनी रिक्षाला गाठलं आणि चालकाला हुसकावून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

दरम्यान, सर्व आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Post a Comment

 
Top