0


बीड : तिसरीत शिकणा-या मुलीकडे पुस्तके नसल्याने तिला शाळेतून चक्क हाकलून देण्यात आले आणि याचाच जाब विचारत त्या शिक्षकाची बदली करण्याची मागणी गावक-यांच्या जीवावरच उठली,,, गटशिक्षण अधिका-यांकडे तक्रार का दिली म्हणून जिल्हा परिषदेच्या संतप्त शिक्षकाने गावक-यांवर चाकुने हल्ला चडविला, या भ्याड हल्ल्यात गावातील दोन तरुणांचा जागीच मृत्यु झाला तर एकाची मृत्युशी झुंज सुरु आहे, शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुलतानपुर येथे घडलीय आहे. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला आहे, दरम्यान हल्लेखोर शिक्षकांसह त्याच्या दहा साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे,
  शाळेत पुस्तके आणली नाहीत तर त्यांना शाळेतून हाकलून दिले जात होते,,, आणि हाच जाब विचारण्यासाठी गावातील महादेव रामप्रसाद खेत्रे आणि योगेश लक्श्मण खेत्रे या तरुणानी पुढाकार घेतला होता, आरोपी शिक्षक मुकुंद खेत्रे काही एकायाला तयार नव्हता, आखेर दोघा तरुणानी गेवराईच्या गटशिक्षण अधिका-यांकडे शिक्षकाच्या बदलीसाठी तक्रार केली, आणि हेच या तरुणाच्या जीवावर बेतला, माझी तक्रार का केली म्हणून शिक्षक मुकुंद खेत्रे आणि त्याच्या १० ते १२ साथीदारानी रात्री गावक-यांवर चाकुने हल्ला चडवित महादेव रामप्रसाद खेत्रे, योगेश लक्श्मण खेत्रे आणि दीपक बनकर याना चाकुने भोसकले यात महादेव खेत्रे, योगेश खेत्रे दोघांचा जागीच मृत्यु झाला आहे

मयत महादेवचा चुलत भाऊ

हा फोटोत दिसणारा तोच शिक्षक आहे ज्याने तमाम शिक्षकी पेशालाच काळीमाँ फासलाय,,, मुकुंद खेत्रे अस या आरोपी शिक्षकाचे नाव आहे, या हल्यात दीपक बनकर या तीस-या तरुणालाही चाकुने वार करण्यात आले होते, त्याचीही प्रकृति गंभीर असून तो मृत्युशी झुंज देतोय, त्याच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत, दरम्यान या हल्लेखोराना कड़क शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीड़ित कुटुंब करते आहे

मयत योगेशची आई
शिक्षक हा समाजाचा आरसा असतो, समाजाला दिशा देण्याचे मौलिक कार्य शिक्षकांकडूनच होते, मात्र बीडच्या या सैतान शिक्षकाने अशी ह्त्या करुण शिक्षकी पेशालाच कलंकित केलय, मुकुंद खेत्रे या गुंड शिक्षकासह त्याच्या १० साथीदाराना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत,

Post a Comment

 
Top