0

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
मंगळवेढा नगरपालिकेने नागरी आघाडीच्या काळात सर्वाधिक विकासकामे केली. या काळात रस्ते, पाणी, सार्वजनिक शौचालये, व्यापारी संकुले आदी कामे मोठय़ा प्रमाणात करुन आम्ही सक्षमपणे कारभार करु शकतो व विकास करु शकतो हे दाखवून दिले. परंतू नंतरची निवडणूक जिंकणो शक्य झाले नाही. मात्र, तब्बल २0 वर्षानंतर राजकीय समीकरणे बदलली गेली आणि अरुणा दत्तू या मंगळवेढा नगरपालिकेच्या खुल्या प्रवर्गातून पहिल्या नगराध्यक्षा झाल्या. मात्र, त्यांच्यासमोर आता नगरपालिकेच्या विकासाचा रूतलेला गाडा पळविण्याचे प्रमुख आव्हान असून त्यात त्या कितपत यशस्वी ठरतात, हे येणारा काळच सांगणार आहे. मुरलीधर दत्तू यांनी उपनगराध्यक्षपद भोगले असून त्या काळात यांनी विकासाची कामे केली. सध्या नगरपालिकेकडून कसलीच विकासाची कामे होत नाहीत. इतकेच नव्हे तर प्राथमिक सुविधा देखील नगरपालिकेकडून जनतेला दिल्या जात नाहीत. रस्ते उखडून खराब झाले आहेत, स्वच्छतेचा पत्ता नाही, विकासकामे खुंटली आहेत. अधिकारी, कर्मचारी नसल्यामुळे विकासकामांवर परिणाम झाला आहे. वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम संपले असून केवळ नियोजन व पाठपुरावा नसल्यामुळे शहराला पुरेसा व नियमित पाणी पुरवठा होवू शकत नाही. शहरातील सार्वजनिक शौचालयाची अवस्था वाईट आहे. या सर्व गोष्टी सुरळीतपणे निट करण्यासाठी नगराध्यक्षा अरुणा दत्तू यांनी सर्वांना बरोबर घेवून, विश्‍वासात घेवून पारदर्शक कारभार सुरु केल्यास विकासकामाला वेग येणार आहे. स्वत: नगराध्यक्षा दत्तू यांचा कारभार सरळ आहे. परंतू विरोधकातून सुचना, उपसुचना देवून कामात दिरंगाई येण्यासाठी प्रय▪केले जात असल्याचे दिसत आहे. नगरपालिका हे शहरातील विकासाचे प्रमुख केंद्र आहे. नगरसेवक विश्‍वस्त आहेत. ते जनतेचे प्रतिनिधी आहेत. हेच नगरसेवक विसरले असल्यामुळे पालिकेच्या कामावर त्याचा परिणाम झाला आहे.

Post a Comment

 
Top