महादेव कोळी समाजाच्या प्रश्नांवर विधीमंडळात चर्चा विधीमंडळात सकारात्मक उत्तर मिळाले नाही
पंढरपूर / प्रतिनिधी
राज्यातील महादेव कोळी समाजाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याबद्दल तसेच महादेव कोळी समाजाचा एस.टी. प्रवर्गामध्ये समावेशाबाबत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके तसेच उदगीर मतदार संघाचे आमदार सुधाकर भालेराव यांनी दिलेल्या तारांकित प्रश्नावर विधीमंडळात चर्चा झाली. मात्र, संबंधीत मंत्र्यांनी महादेव कोळी समाजाला सभागृहात जी लेखी उत्तरे दिली ती असमाधानकारक होती. यामुळे विरोधी आमदारांनी शासनाच्या या भुमिकेचा निषेध केला. जुलै २0१४ मध्ये मुंबई येथे महादेव कोळी समाजाच्या मागण्यांसाठी राज्यातील महादेव कोळी समाजाचे आंदोलन केले असता विद्यमान मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, तत्कालीन विरोधी पक्षनेता हे त्या आंदोलनामध्ये सरकार आमचे आले तर कोळी समाजास त्वरीत न्याय देवून नोकरीवर असणार्यांना संरक्षण व नोकरीतून काढून टाकलेल्यांना पुन्हा संरक्षण देण्याबाबत आम्ही सकारात्मक विचाराने प्रश्न निकाली काढू अशी भाषणे केली होती. मी त्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी उपस्थित असल्यामुळे त्याचा साक्षीदार आहे. त्याच आशेने मी हा तारांकीत प्रश्न विचारला होता पण, सकारात्मक उत्तर न आल्याने जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांची वेळ घेवून राज्यातील महादेव कोळी समाजाचे शिष्टमंडळ घेऊन त्यांना भेटून पूर्वीच्या सरकारने तत्कालीन महसूल मंत्र्यांची नेमलेली समिती त्या समित्याच्या अहवालावर आजपावेतो निर्णय झालेला नाही. आता महायुतीचे आपले सरकार आल्यामुळे महादेव कोळी समाजाच्या प्रश्नाला न्याय द्यावा अन्यथा यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात कोळी समाजाला न्याय देण्यासाठी मोर्चे, आंदोलने करण्यात येतील व सभागृहातही आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी दिला आहे.
Post a Comment