दि२५. : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात प्लँचेट केल्याने पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांची बदली केली, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. प्लँचेट केलंच नाही असं म्हणणाऱ्या पोलिसांचं पितळ मात्र अजित पवारांच्या दाव्याने उघडं पडलं आहे.
शोधपत्रकार आशिष खेतान यांनी एका स्टिंग ऑपरेशनद्वारे हा प्लँचेटचा प्रकार उघड केला होता. मात्र त्यानंतर गुलाबराव पोळ यांनी हे आरोप सातत्याने फेटाळले होते. पण आता खुद्द अजित पवार यांनीच प्लँचेटची कबुली दिली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली त्यावेळी गुलाबराव पोळ हे पुण्याच्या पोलिस आयुक्तपदावर कार्यरत होते. अनेक महिने उलटल्यानंतरही या प्रकरणात काहीच धागेदोरे हाती येत नसल्याने मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी एका निवृत्त हवालदाराच्या मदतीने प्लँचेट केल्याचा आरोप आशिष खेतान यांनी केला होता.
__________________________________
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment